शिरूर
( प्रतिनिधी ) पाबळ ता. शिरुर येथील थापेवाडी येथील मंगल कार्यालय जवळ दुचाकीहून आलेल्या दोघा युवकांनी ज्येष्ठ इसमाच्या गळ्यातील दोन तोळे वाजणाची सोन्याची सोन साखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात दुचाकी स्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाबळ ता. शिरुर येथील थापेवाडी रस्त्याने पांडुरंग गावडे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १४ एल एफ ९११४ या दुचाकीहून पाबळ कडे येत असताना पाठीमागून दुचाकीहून दोघेजण आले त्यांनी गावडे यांना कर्फ्यू आहे कोठे चालला असे म्हणून थांबवत त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून भरधाव वेगाने पाबळ बाजूकडे पळून गेले, याबाबत पांडुरंग ज्ञानेश्वर गावडे वय ७४ वर्षे रा. राऊतमळा पूर ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संतोष शेळके हे करत आहे.