शिरसगाव काटा ता शिरूर येथे पावणे दोन लाखाची च दागिन्यांची चोरी

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
शिरसगाव फाटा ता.शिरूर अर्धवट ट उघडा असलेल्या घराच्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील देव्हाऱ्याखाली लाकडी कप्प्यात ठेवलेली सोन्या चांदीची दागिने एकूण किंमत १ लाख ७८ हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे.
        सुभाष भिकोबा कदम (वय ७० वर्षे, रा. मानेवाडी शिरसगावकाटा शिरूर जि पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
          याबाबत आज्ञात चोरट्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती दिनांक आठ ऑगस्ट रात्री बारा ते नऊ ऑगस्ट पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान शिरसगावकाटा ता शिरूर जि पुणे येथे फिर्यादीचे घराचा अर्धवट उघडा असलेल्या दरवाज्यामधून कोणीतरी अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून घरामध्ये देवा-याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेला  दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमची कानातील डोरले, तीन ग्रॅम ची अंगठी, पाच ग्रॅमची अंगठी, तीन ग्रॅम चे मनी, दीड ग्रॅम ची डोरले, नाकातील चमकी, असा सोन्याचा तर चांदीचे जोडवे असा एकूण १ लाख ७८ हजार रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरटयाने चोरून नेला आहे. म्हणून त्या अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोथळकर करत आहे. 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!