शिरुर शहरात शिरुर नगरपरिषदचा वतीने हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली
ऑगस्ट ११, २०२४
0
शिरुर दिनांक ( वार्ताहर) शिरुर शहरात शिरुर नगरपरिषदचा वतीने हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली . ०९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत "घरोघरी तिरंगा" मोहीम राबविण्याचे नियोजन नगरपरिषदे मार्फत करण्यात आले आहे. यावेळी नगरपालिकेचा वतीने माहिती देण्यात आली की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून "हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम लोकांना तिरंगा घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याची ओळख म्हणून तो फडकावण्यासाठी प्रोत्साहित करते. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे. गेल्या दोन वर्षात 'हर घर तिरंगा मोहीम लोक चळवळ बनली असून सदर मोहीम राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी केली जात आहे. "घरोघरी तिरंगा" मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. सन २०२४ या वर्षामध्ये दिनांक ०९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत "घरोघरी तिरंगा" मोहीम राबविण्याचे नियोजन नगरपरिषदे मार्फत करण्यात आले आहे. त्या अनुसंघाने शिरूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहरांमध्ये शिरूर नगर परिषदेच्या वतीने विद्यार्थी,शिक्षक, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहभागातून "हर घर तिरंगा" अभियान अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्याने सामूहिक देशभक्तीपर सांस्कृतिक नृत्य सादर केले, शहरातून ढोल ताशा वाद्यांसह विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन रॅली काढली. शहरातील हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन "तिरंगा प्रतिज्ञा" घेण्यात आली. सदर कार्यक्रमास शिरूर नगरपरिषेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, मोहन गुरव, विठ्ठल साळुंके, अक्षय बनगीनवार, रत्नदीप पालके, मिठ्ठू गावडे, प्राची वाखारे, वैशाली खांडरे, स्वाती थोरात शिनप शाळा मुख्याध्यापिका सुजाता भोसले तसेच शिक्षक नंदा वेताळ, वंदना भोसले, मिरा थोरात, अंजली माने, .कुसुम लांघी, .भानुदास हंबीर, सौ. समिधा यादव, धनंजय जाधव, संजय शिंदे, आदी उपस्थित होते.
Tags