शिरूर प्रतिनीधी
शिरूर शहरातील पथविक्रेते बांधकाम कामगार यांना शासनाच्या स्वनिधी से समृद्धी या योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शिरूर शिरूर नगर परिषदेच्या वतीने पाच ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान शिबिराच्या आयोजन केले असल्याची माहिती शिरूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी सांगून या शिबिरात ५ ऑगस्ट पासून सुरू झाली असल्याचे त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान “स्वनिधी से समृद्धी” या कार्यक्रमा अंतर्गत पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांना.
पीएम सुरक्षा बीमा योजना, पीएम जीवन ज्योति योजना, पीएम श्रम योगी मानधन योजना, वन नेशन वन रेशन योजना, पीएम जनधन योजना, जननी सुरक्षा योजना, पीएम मातृ वंदना योजना, इमारत व इतर बांधकाम कामगार योजना अशा एकुण ८ योजनांचा लाभ देण्यासाठी शिरूर नगर परिषदेच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या अनुषंगाने दि. ५ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान शिरुर शहराच्या विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालय येथून शिबिराच्या पहिल्या टप्प्यांची सुरुवात करण्यात आली आहे. सदर शिबिरास पथविक्रेते, बचत गटातील महिला सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमास NULM विभागाचे स.प्र.अ. विजय आंधळे, समुदाय संघटक मिठू गावडे. शहर व्यवस्थापन कक्षाच्या निता जाधव, सुप्रिया गोसावी हे करत आहेत.
या शिबिरास जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी बांधकाम कामगार यांनी हजर राहून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले आहे.