शिरूर
( प्रतिनिधी ) धामारी ता. शिरुर येथील विनय डफळ या परिस्थितीशी झगडत शेती करुन जिद्दीने अभ्यास करत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरतीची परीक्षा देऊन नुकताच यशस्वी होत जलसंपदा विभागाचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अधिकारी झाला आहे.
धामारी ता. शिरुर येथील विलास डफळ व शारदा डफळ या शेतकरी दांपत्याच्या घरात विनयचा जन्म झाला, डफळ कुटुंबियांची परिस्थिती जेमतेम असल्याने ते मुलांच्या शिक्षणासाठी पेरणे ता. हवेली या विनयच्या मामाच्या गावी राहू लागले पेरणेत विनयने पहिली ते पाचवीचे शिक्षण घेतले त्यांनतर डफळ कुटुंब धामारीत आले, दरम्यान विनयने परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या आई वडिलांना शेतीमध्ये हातभार लावत शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करुन पाचवी ते दहावीचे शिक्षण धामारीत घेऊन दिवेआगर व आयओके कॉलेज पिंपळे जगताप येथे पदवीचे शिक्षण घेतले, शिक्षणादरम्यान घरी आई वडिलांना शेतीच्या कामांना मोठा हातभार लावून केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी विनय करत असताना त्याने नुकतेच महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरती २०२४ ची परीक्षा देत आपले नशीब आजमावले असताना सदर परीक्षेचा निकाल जाहीर होऊन विनय जलसंपदा विभागाचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अधिकारी पदी नियुक्त झाला असल्याचे त्याच्या या जिद्द व यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. तर याबाबत बोलताना आमच्या कष्टाची जाणीव ठेवून आमच्या मुलाने यश मिळवले असल्याचे कौतुक वाटत असल्याचे वडील विलास व आई शारदा डफळ यांनी सांगितले.
स्वतंत्र चौकट १ –
युवकांनी परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते फक्त युवकांनी जिद्द ठेवली पाहिले असे विनय डफळ याने सांगितले.
फोटो खालील ओळ – धामारी ता. शिरुर येथील विनयच्या यशाबद्दल त्याचा सन्मान करताना आई वडील.
