जिल्हा परिषद शाळेतून अनेक रत्न निर्माण – सुजाता पवार

9 Star News
0
शिरूर 
( प्रतिनिधी ) जिल्हा परिषदेच्या शाळेंनी विद्यार्थी रूपाने अनेक मौल्यवान रत्न तयार केली असून सर्व रत्न विविध उच्च पदावर कार्यरत आहे मात्र हे रत्न घडवणाऱ्या तालुक्यातील गुणी शिक्षकांचा संघटनेच्या वतीने सन्मान होत असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी केले आहे.

                             शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने नुकतेच शिरुर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे संभाजीराव थोरात हे होते तर याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे, शिक्षण सहसंचालक रमाकांत काटमोरे, शिक्षक संघटनेचे नेते रावसाहेब रोहकले, प्राथमिक शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंडे, चिटणीस खंडेराव ढोबळे, बापूसाहेब लांडगे, शांताराम घोरपडे, सुरेश सातपुते, सुनील शेळके, अध्यक्ष संतोष गावडे, तालुकाध्यक्ष नयन आरगडे, कार्यध्यक्ष राहुल घोडे, उपेंद्र डुंबरे, सोपान शेलार, हिरामण ढोकले यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब रसाळ व जयमाला मिडगुले यांनी केले तर प्रास्ताविक संतोष शेवाळे यांनी केले आणि राजाराम सकट यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथील अरुचना मांढरे यांचा सन्मान करताना पदाधिकारी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!