शिरूर पंचायत समिती ब बीओ टी प्रकल्पातील गाण्यासाठी दहा लाख रुपये देऊनही गाळा नावावर होत नसल्याने व ठेकेदाराची मनमानी व दहशत दडपशाहीला कंटाळून शिरूर येथील हॉटेल व्यवसायिक महिला सीमा गिरमकर यांनी आज पासून शिरूर पंचायत समिती कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे.
दोन दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना दिवशी शिरूर पंचायत समिती बी ओ टी प्रकल्पावरून किंवा सतरा कमानी पुलावरून कुटुंबासह नदीत उडी मारून आत्महत्या करणारा असल्याचा इशारा उपोषणकर्त्या सिमा गिरमकर दिला आहे.
शिरूर नगर परिषदेच्या टपऱ्या हटवण्याच्या कारवाईनंतर अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. छोटे हॉटेलच्या माध्यमातून पै पै गोळा करून या पंचायत समिती बीओ टी मधील गाळा नंबर 24 हा घेतला आहे. त्याच्यासाठी पोटाला चिमटा घेऊन दहा लाख रुपये ठेकेदाराला दिले आहे.
याबाबतच्या सर्व पावत्याही माझ्याकडे आहे. या ठेकेदाराला अनेक वेळा गाळा नावावर करून देण्यासाठी व उरलेले पैसे देतो असे सांगितले असता नाही. या ठेकेदाराने आमच्यावर दहशत निर्माण केली
व मी एक गरीब कुटुंबातील महिला असल्याने व यांच्या पाठीमागे कोणी येणार नाही हे त्यांना माहिती असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन ठेकेदाराने गाळा नावावर करण्यास विरोध केला.
पंचायत समिती शिरूर येथील बहुचर्चित बी.ओ.टी प्रकल्पातील व्यापारी गाळयासाठी शिरूर येथील सिमा गिरमकर रा. शिरूर या महिलेने बुकींग करून सन २०१५ पासून २०२२ पर्यंत ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने त्यांना गाळा देण्यास नकार दिला आहे.त्यामुळे त्यांचा मानसिक व आर्थिक छळ झाला आहे. त्यांना याबाबत न्याय मिळत नसल्याने त्या कुंटुबासह त्याच इमारतीवरून ( दि. १५ ऑगस्ट ) रोजी उडी मारून जीवनयात्रा संपवणार आहे. त्याबाबतचे लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,अजितदादा पवार ,खासदार अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार, तहसीलदार शिरूर पोलीस स्टेशन शिरूर यांना दिले आहे.
सिमा गिरमकर यांनी मोठ्या कष्टाने पै- पै गोळा करून त्यांनी व्यवसायासाठी गाळा घेण्याचे ठरवले होते. ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने त्यांना त्या गाळ्याचे खरेदीखत करून दिलेले नाही. ठेकेदाराला भरलेल्या पैशाची बँक नियमाप्रमाणे त्याचे दुप्पट पैसे झाले असते. त्यांनी वेळोवेळी गटविकास अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली.
त्यामुळे पंचायत समिती बीओटी ठेकेदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्यापासून होणाऱ्या त्यांच्या आर्थिक व मानसिक छळा पासून त्यांना न्याय मिळेल का ?त्यांच्या कुटुंबाच्या कष्टाच्या भरलेल्या पैशातून त्यांना जगण्यासाठी घेतलेला गाळा त्यांना आता मिळेल का? अशा एका असह्य महिलेने तिला हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला असून त्यांना न्याय न मिळाल्यास त्या आता १५ ऑगस्ट रोजी सहकुटुंब त्याच बीओटी इमारतीवरून उडी मारणार आहे. किंवा सतरा कमानी पुलावरून उडी मारून जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या उपोषणाला आदिशक्ती महीला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, सामाजिक कार्यकर्त्या उषा वाखारे, आधार छायाच्या सविता बोरुडे, मनसेच्या डॉक्टर वैशाली साखरे, कल्पना चांदगुडे,
सामजिक कार्यकर्ते रामा झेंडे, प्रिती बनसोडे पल्लवी शेगोकार माधुरी निगडे. या सह मोठया प्रमाणात महीला संघटनानी पाठींबा दिला आहे.
