शिरुर पंचायत समितीने केला माजी सैनिकांचा सन्मान

9 Star News
0
शिरुर पंचायत समितीने केला माजी सैनिकांचा सन्मान
शिरूर दिनांक प्रतिनीधी 
       स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत शिरूर पंचायत समितीच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान व सत्कार केला.
         स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा उपक्रमा अतंर्गत स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन तिरंगा उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासन व मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांचे सुचनेनुसार शिरुर तालुक्यातील माजी सैनिकांचा सन्मान कऱण्यात आला.

         या कार्यक्रमास शिरुर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबन पवार, उपाध्यक्ष शहाजी पवार, ऑडनरी कॅप्टन थेउरकर, ऑडनरी कैप्टन कटके विविध गावचे माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व उपस्थित माजी सैनिकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करणेत आला. सुरेश उमाप विठठल जाधव व शामराव धुमाळ या माजी सैनिकांनी आपले सैनिक सेवेतील अनेक अनुभव सांगुन आपल्या देशाप्रती व ध्वजाच्या मुल्यांसाठी वचनब्द होण्यासाठी प्रोत्साहीत केले.

गट विकास अधिकारी महेश डोके यांनी पंचायत समिती प्रशासन माजी सैनिक बांधवांना सेवा पुरविण्यासाठी नेहमीच कटीबध्द राहणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक गट विकास अधिकारी राम जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमास पंचायत समिती कार्यालयातील खातेप्रमुख व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करणेत आली. उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमांबाबत आनंद व्यक्त करुन सर्व माजी सैनिकांनी पंचायत समिती प्रशासनाचे आभार मानले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!