शिरूर हवेली मतदार संघात तसेच सोरतापवाडी ग्रामपंचायतीसाठी यापुढील काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून या भागाचा काया पालट करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले.
ग्रामपंचायत सोरतापवाडी येथे पुणे जिल्हा नियोजन समिती व ग्रामपंचायत फंडातून मंजूर करण्यात आलेल्या १३० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भुमीपुजन समारंभ पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या शुभहस्ते व पंचायत समितीचे मा.सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
पुणे जिल्हा नियोजन समिती चे सदस्य प्रविण काळभोर,दिलीपराव वाल्हेकर,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद,संचालक सुदर्शन चौधरी,सरपंच स्नेहलताई चौधरी,उपसरपंच विजय चौधरी,माजी.सरपंच सागरनाना चौधरी,भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पुनमताई चौधरी,माजी उपसरपंच शंकरबापू कड,राजेंद्र गुंजाळ, संतोष गायकवाड,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपोतरवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्हा नियोजन समितीच्या कडून निधी आणून या भागात विकासाची गंगा आणली असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर यांनी सांगून या पुढील काळात महायुती सरकारच्या माध्यमातून या भागातील विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
