शिरूर नगर परिषदेच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान आणि सत्कार

9 Star News
0
शिरुर,प्रतिनीधी 
        भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर हर घर तिरंगा अभियान अंतर्गत शिरूर नगर परिषदेच्या वतीने देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमासाठी शिरूर शहरातील व आसपासचे आजी व माजी सैनिक कॅप्टन प्रभाकर बाबुराव थेऊरकर, कॅप्टन विश्वनाथ गोविंद माडगे, कॅप्टन जयवंत किसन कटके, लक्ष्मण जगदाळे, राज गोपाळ, श्रीमती शीतल दत्ता कांडेकर, रामदास आबासाहेब दळवी, शरद रंगनाथ शिंदे, श्रीमती शोभा गोपीनाथ नवले, जयसिंग ढवळे आदि आजी माजी सैनिक यांना सन्मानित करण्यात आले . 
     यावेळी माजी सैनिकांनी आपल्या सेवा काळातील सन 1971 ची लढाई तसेच कारगिल युद्ध मधील अनुभव सांगितले .
      यावेळी शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे , प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ सहाय्यक कर निरीक्षक रामचंद्र नरवडे, संगणक अभियंता रत्नदीप पालके, लेखाधिकारी पंकज माने, लेखापाल मोहन गुरव, कर निरीक्षक अक्षय बनगिनवार, रचना सहायक पंकज काकड, आस्थापना प्रमुख विठ्ठल साळुंके, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, चंद्रकांत पठारे, अमृत भवर, . प्रमोद पवार, . विनोद उबाळे, . भगवान दळवी, उपेंद्र पोटे, भूषण कडेकर, महेश गावडे आदी उपस्थित होते. भूषण कडेकर यांनी आभार मानले .

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!