पाबळच्या खून व दरोड्या तीन वर्षे फरार आरोपी जेरबंदशिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी

9 Star News
0
(शिरूर प्रतिनिधी ) पाबळ ता. शिरुर येथील जमदाडे मळा येथे १ मे २०२१ रोजी घरात झोपलेल्या मायलेकिंवर सशस्त्र हल्ला करुन मायलेकींना गंभीर जखमी करुन दरोडा टाकल्याची घटना घडलेली असताना यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल तीन वर्षे फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले असून सौरभ डायवऱ्या भोसले असे सदर आरोपीचे नाव आहे.
                  पाबळ ता. शिरूर येथील जमदाडे मळा या ठिकाणी राहणाऱ्या तुळसाबाई जाधव व शकुंतला शिंदे या मायलेकी घरात झोपलेल्या असताना १ मे २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करत काही दागिने चोरून नेले होते, यावेळी चोरट्यांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तुळसाबाई पर्वती जाधव व शकुंतला प्रकाश शिंदे या मायलेकी जखमी झाल्या होत्या उपचारादरम्यान शकुंतला प्रकाश शिंदे वय ७० वर्षे रा. जमदाडे मळा पाबळ ता. शिरूर जि. पुणे यांचा मृत्यू झाला होता, सदर गुन्ह्याचा तपास करत असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत या गुन्ह्यातील दिनेश कुंडल पवार, भेंड्या उर्फ अविनाश किरण काळे, नाग्या उर्फ नागेश संतोष काळे, संतोष तकत्या काळे यांना अटक केली मात्र या गुन्ह्यातील सौरभ डायवऱ्या भोसले हा तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असताना सौरभ हा तळेगाव ढमढेरे परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक विकास पाटील, रोहिदास पारखे, जयराज देवकर, प्रताप कांबळे यांनी साध्या वेशात जाऊन तळेगाव ढमढेरे परिसरात सापळा लावत तीन वर्षांपासून फरार असलेल्या सौरभ डायवऱ्या भोसले वय २४ वर्षे रा. वैदवाडी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे याला जेरबंद करत अटक केली, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.
फोटो खालील ओळ – पाबळ ता. शिरुर येथील दरोडा व खुनातील तीन वर्षे फरार आरोपींला साध्या वेशात सापळा लावून अटक करताना पोलीस.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!