निमोणेत जावयाने सासूच्या दागिन्यांवर मारला डल्ला

9 Star News
0
निमोणेत जावयाने मारला सासूच्या दागिन्यांवर मारला डल्ला
शिरूर ( प्रतिनिधी ) निमोणे ता. शिरुर येथे सासूच्या घरी आलेल्या जावयाने सासूच्या दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत चोरी केल्याची घटना घडली आहे.
      हर्षल शिवाजी साबळे (वय २४ वर्षे रा. ग्लोरी सोसायटी मोशी पुणे ) या जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत बेबी भाऊसाहेब मूर्तीमोडे वय ६५ वर्षे रा. नागेश्वर मंदिर जवळ निमोणे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
                    याबाबत शिरूर पोलीस यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे निमोणे ता. शिरुर येथील बेबी मूर्तीमोडे यांचा जावई हर्षल २६ ऑगस्ट त्यांच्या घरी आलेला होता, सायंकाळच्या सुमारास जावई परत गेला असता घरातील दागिन्यांचा डबा गायब असल्याचे बेबी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दागिन्यांच्या डब्याची पाहणी केली असता दोन तोळे वजनाचे दागिने असलेला डबा चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने याबाबत बेबी भाऊसाहेब मूर्तीमोडे वय ६५ वर्षे रा. नागेश्वर मंदिर जवळ निमोणे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी हर्षल शिवाजी साबळे वय २४ वर्षे रा. ग्लोरी सोसायटी मोशी पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विनोद मोरे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!