कारेगाव ता. शिरूर येथे अल्पवयीन मुलीवर बापाने अत्याचार केल्याची घटना घडली असून पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून त्याला शिरूर न्यायालयात हजर केले असता 3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे कारेगाव परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.न्यायालयाने त्यास ३ संप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे वाशिम येथील हे कुटुंब काही वर्षापासुन कामानिमित्त रांजणगाव कारेगाव औद्योगिक वसाहतीत आले आहे . कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन आई-वडील अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ असे कुटुंब या ठिकाणी राहत होते तर त्यांचे ३५ वर्षीय वडील वाहनावर चालक म्हणून काम करत होते..
संबंधित नराधम बाहेरख्याली असल्याने त्याचे एका महिलेची अनैतिक संबंध होते त्यामुळे त्याची पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून घर सोडून वेगळी राहत होती. दहा दिवसापूर्वी त्याच्या अनैतिक संबंधात असणारी महिला निघून गेली होती. त्यानंतर वासनेने पछाडलेल्या या नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली पित्याच्या या अत्याचाराने भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने व तिच्या अल्पवयीन भावाने आपल्या आईला फोन करून वडील करत असलेल्या अत्याचारात बाबत माहिती दिली
ही माहिती मिळताच मुलीच्या आईने आपल्या मैत्रिणीला फोन करून या अत्याचाराबाबत माहिती दिली .मैत्रीण पीडित मुलीच्या घरी येऊन तिला व तिच्या भावाला २७ ऑगस्ट रोजी
पोलीस स्टेशनला घेऊन गेली व तिथे बापाच्या अत्याचाराचा पाढा वाचला पोलिसांनी याबाबत बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी लगेचच नराधम पित्याला अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळतात शिरूर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पोलीस उपनिरीक्ष निळकंठ तिडके यांनी घटनास्थळास भेट दिली असून, पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सविता काळे करीत आहे. या घटनेचा तपासअभिमान कोळेकर ,दत्ता शिंदे , विलास आंबेकर , विद्या बनकर , माधुरी झेंडगे यांच्या पथकाने केला.