म्हाडाच्यावतीने शिरूर शहरात ७० सदनिका उपलब्ध तर दुसऱ्या टप्प्यात ५०० सदनिका उपलब्ध होणार - शिवाजीराव आढळराव पाटील
शिरूर दिनांक प्रतिनिधी म्हाडाच्यावतीने शिरूर शहरात ७० सदनिका उपलब्ध तर
शिरूर बाह्य मार्गावर थिटे कॉलेज जवळ म्हाडाची चार एकर जागा असून, या जागेत गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चारशे ते पाचशे दर्जेदार सदनिका करणार असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी खासदार तथा म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून लवकरच या योजनेचे काम सुरू करणार असलेचे त्यांनी सांगितले.
जुनी शिरूर नगरपरिषद इमारत येथील गाळ्यामध्ये पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरूर शहरात गोलेगाव रोड येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी कमी किमती ७० सदनीका उपलब्ध झाल्या आहेत यासाठी ची माहिती मिळवण्यासाठी सुविधा केंद्राचे उद्घाटन म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील उप अभियंता प्रकाश वाबळे ,शुभांगी पतंगे, शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके, शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे,कनिष्ठ अभियंता पूजा ढमढेरे , सहाय्यक अभियंता प्रफूल्ल लोखंडे , सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी राहुल नवले, गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची माजी अध्यक्ष शशिकांत दसगुडे, माजी नगरसेवक विठ्ठल पवार, चंदन सोंडेकर,शिवसेनेचे रवींद्र करंजखेले,अनिल काशीद, शहर प्रमुख मयूर थोरात, जयवंत साळुंखे ,राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष शरद कालेवार, संतोष शितोळे, जगदीश पाचर्णे, उपस्थित होते.
शिरूर शहरात म्हाडाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 70 सदनिका व आठ दुकान गाळे तयार करण्याची काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात हे काम झाले असून शिरूर शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आढळराव यांनी करून याबाबत कर्जासाठी कुठे अडचणी येत असल्यास त्यासाठी भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर या योजनेसाठी या योजनेसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले तहसीलदार यांनी त्वरित नागरिकांना द्यावेत असेही आदेश त्यांनी दिले आहेत.
तर शिरुर ही महत्वाची बाजारपेठ असून दोन जिल्ह्याचा सीमेवरती शिरुर शहर आहे . शिरुरची लोकसंख्या वाढत असून परिसरात एमआयडीसी असून आणखी वाढत आहे तेथील v तालुक्यांतील नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून शासन कटिबध्द असून,शिरूर बाह्य मार्गावर थिटे कॉलेज शेजारी असणाऱ्या चार एकर म्हाडाच्या जागेत ४००ते ५०० सदनिका व गाळे होणार असून त्याचा प्लॅन तयार आहे दोन ते तीन महिन्यात या कामास सुरुवात होणार असल्याचे आढळराव यांनी सांगून शिरूर शहराच्या वैभवात यामुळे भर पडणार असून नागरीकांना त्याचा फायदा होणार आहे.
