निल मैड ची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

9 Star News
0
निल मैड ची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
शिरूर 
(  प्रतिनिधी ) करंदी ता. शिरुर येथील जे जे इंटरनेशनल स्कूलचा विद्यार्थी निल प्रशांत मैड याची चौदा वर्षीय राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण संघामधुन निवड झाली असल्याची ,माहिती प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर यांनी दिली आहे.
                         करंदी ता. शिरुर येथील जे जे इंटरनेशनल स्कूलचा विद्यार्थी निल प्रशांत मैड याने नुकतीच टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथील अंथरणे येथे टेनिस क्रिकेट जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेतला असताना निल मैड याची सर्वगुण संपन्न असा ऑलराउंडर खेळाडू म्हणून निल निवड करण्यात आली असून बारामती येथे २३ ते २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण संघामध्ये निलची निवड करण्यात आली असून त्याच्या निवडीबद्दल येणार होती.त्याच्या निवडी बद्दल जे जे इंटरनेशनल स्कूल शाळेचे संस्थापक व बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, व्यवस्थापक प्रा. सुनीता फुके, प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, प्रशिक्षक चेतन झाडकर, प्रा. लता शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
सोबत - निल मैडचा फोटो.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!