शिरूर दिनांक प्रतिनिधी
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीमुळे अण्णापूर, ढोकसांगवी निमगाव भोगी, आमदाबाद, शिरूर ग्रा. शिरूर नगरपरिषद, कर्डेलवाडी सरदवाडी या गावांना मोठ्या प्रमाणात केमिकल प्रदूषनाचा त्रास होत असल्याने या गावांनी कंपनी विरोधात एल्गार पुकारल आहे.एम आय डी सी ने दिलेले वाढीव क्षेत्र रद्द व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या कंपनी विरोधात अण्णापूर, ढोकसांगवी निमगाव भोगी, आमदाबाद, शिरूर ग्रा. शिरूर नगरपरिषद, कर्डेलवाडी सरदवाडी या गावची सरपंच , ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांची अण्णापूर येथे संयुक्त बैठक झाली.
या बैठकीला शिरूर पंचायत समिती माजी उपसभापती वाल्मिकराव कुरुंदळे, पंचायत समिती सदस्य दादा पाटील घावटे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, शिरूर नगरपालिका नगरसेवक विठ्ठल पवार, अण्णापूर विद्यमान सरपंच दीपिकाताई शिंदे ,उपसरपंच संतोष शिंदे, शिरूर ग्रामीण माजी सरपंच विठ्ठल घावटे,कर्डेलवाडी सरपंच ,सरद वाडी सरपंच ,उपसरपंच निमगाव भोगी सरपंच उज्ज्वला इचके उपसरपंच सांबारे सरदवाडी सरपंच उपसरपंच व नागरीक उपस्थित होते
. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र
एन्व्हायरो पावर लिमिटेड कंपनी गेल्या अनेक वर्षापासून या भागात चर्चेत असून या कंपनीमुळे या भागातील जवळपास सर्वच गावांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे. तर जमिनीचा पोतही खराब झाला आहे. या भागांतील ओढे नाले, बोरवेल्स यामधून या कंपनीने नष्ट करण्यासाठी टाकलेली घातक केमिकल्स पाण्यामधे मिश्रित झाले आहे.
राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेले घातक केमिकल नष्ट करण्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात जमिनीत खड्डे घेऊन केमिकल्स नष्ट करण्याचे काम करीत आहे. परंतु यामुळें जमीनीच्या पाण्याच्या पातळीपर्यंत हे केमिकल पोचले असून यामुळेच या भागातील पाणी दूषित झाले आहे.
यामुळे या भागातील फळबागा पिके झाडे शेती ऊस पडत आहे. उड्या नाल्यामध्ये आलेले पाणी फेसाळलेले दिसून येत आहे तर या पाण्याचा उग्र वास या भागात पसरत आहे. केमिकल युक्त पाणी उग्र वास यामुळे या भागात त्वचारोग ,श्वसनाचे रोग व गंभीर आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
या केमिकल मुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कंपनीत काही वर्षांपूर्वी नष्ट करण्यासाठी घातक केमिकल आणले होते. या केमिकलच्या वासामुळे अनेक कामगार बेशुद्ध झाले होते तर अनेक कामगार अनेक दिवस आजारी होते.
असे अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळणारे केमिकल या ठिकाणी आणली जात असून या केमिकल मुळे भोपाळ सारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कंपनीच्या या धोकादायक केमिकल मुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी नुकताच या कंपनी विरोधात लोकसभेत आवाज उठवला आहे.
त्यात शासनाने या कंपनीला अधिकची जमीन देण्याचे ठरवले आहे याला विरोध करण्याकरिता व ही कंपनी कायम स्वरूपी बंद करण्यासाठी येथील अण्णपूर, निमगाव भोगी, आमदाबाद, शिरूर ग्रामपंचायत, शिरूर नगरपरिषद, कर्डेलवाडी सरदवाडी, या गावांनी या कंपनी विरोधात एल्गार पुकारला असून यावेळचे बैठकी यावेळी संपन्न झाली.
ही कंपनी कायमस्वरूपी बंद व्हावी अशी मागणही या गावकऱ्यांनी केली असून लवकरच मोठे आंदोलन या कंपनी विरोधात उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.