पुणे अहमदनगर जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव पारनेर शिक्रापूर रांजणगाव खेड येथील एकूण ११ मंदिरात चोऱ्या करणारा सराई चोरट्याला पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने केले अटक
शिरूर दिनांक प्रतिनिधी
पुणे व नगर जिल्ह्यातील शिरूर शिक्रापूर रांजणगाव खेड भागात मंदिराचे उचकटून मंदिरातील देवांचे दागिने चोरणऱ्या अट्टल चोरट्याला पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली असून त्याने अकरा मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली असून चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात यश आले आहे.
पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि.पुणे) असे या मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याचे नाव आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरूर शिक्रापूर रांजणगाव खेड या भागात मंदिराच्या दरवाज्याची कडी कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील देव देवतेंचे दागिने दानपेटीतील रक्कम चोरण्याच्या घटनेत वाढ होत चालली होती. याची गंभीर दाखल घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलास मंदिर तोडीचे गुन्हे उघडीस आणण्याच्या व प्रतिबंध करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्याची तपास सुरू असताना पारगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अभंग, हे त्यांच्याकडील गुन्ह्याचा तपास करीत असताना मंदिर चोरीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना त्यांना एक संशयित चोरी करत असल्याचा आढळून आला. संशयीताची माहिती घेतली असता तो सराईत गुन्हेगार असून विनायक दामू जिते हा आहे अशी माहिती गोपनीय माहितीदाराने दिली. विनायक जिते हा शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई चा असल्याचे समजल्यावर त्याची पोलिसांनी माहिती काढत तो शिक्रापूर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाल्याने पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे व मंगेश अभंग यांनी शिक्रापूर येथे सापळा रचून विनायक जिते याला ताब्यात घेऊन विचारपूस केली परंतु तो उडवा उडवीची उत्तरे देत होता अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदीर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदीर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदीर, असे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे सांगीतले. त्यास आणखी विचारपुस करून तपास केला असता त्याने शिकापुर येथील राउतवाडी येथील श्रीनाथ मस्कोबा मंदीर, शिकापूर येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर येथील कन्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदीर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदीर व कळंमजाई मंदीर, तसेच अहमदनगर जिल्हयातील सुपा येथील तुकाई मंदीर वाडेगव्हाण पारनेर व नगर एम.आय.डी.सी. येथील श्री. खंडोबा मंदिर शिव मल्हारगड,पिंपळगाव माळी इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिर चोऱ्या केल्या असल्याचे सांगीतले आहे. सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे , पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, पोलीस नाईक शांताराम सांगडे, रमेश इचके, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राधे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, सर्व पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे व पोलीस हवालदार विक्रम तापकीर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर, मंगेश थिगळे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी केली.
पारगाव, घोडेगाव, शिरूर, शिक्रापूर, खेड ,रांजणगाव , अहमदनगर जिल्ह्यातील सुपा, अहमदनगर एमआयडीसी, या पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी मंदिरात रात्रीच्या वेळेस चोऱ्या केले आहे.