पुणे ऐतिहासिक शहरात दिनांक 11 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती सूर्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भव्य मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीला व सभेला शिरूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन माजी सरपंच संभाजी कर्डिले यांनी केले आहे.
तसेच बहुसंख्य मराठा कामगार बांधवानी येणाऱ्या ११ ऑगस्ट रोजी पुणे सारसबाग येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व सभेला सहकुटुंब सहपरिवार उपस्थीत राहावे.
तसेच पुणे येथे होणाऱ्या ऐतिहासिक रॅली व सभेचे साक्षीदार होण्यासाठी सर्व मराठा कामगार बांधवांची उपस्थिती आवश्यक आहे.
पुढे भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी आपल्याला जर विचारले की, पुणे येथे मराठ्यांचे क्रांतीसुर्य, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली व सभा झाली होती. त्यावेळी तुम्ही उपस्थित होता का?
त्यावेळी ताठ मानेने तुम्हाला सांगता आले पाहिजे की, हो मी त्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होतो.
आरक्षणाच्या लढाईत माझाही सिंहाचा नाही, पण खारीचा वाटा नक्कीच आहे. त्यामुळेच आपणास यावंच लागतय." घरात बसला तो मराठा कसला" मी येतोय आपण ही या, असे पत्रकार माध्यमांशी संभाजीराजे बोलले.