शिरूर प्रतिनीधी
वीस वर्षांपासून शिरूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, चांगल्या दर्जाने शाळा चालविते. आमच्याविरूद्ध केलेल्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसून, शाळेच्या बदनामीचा हा कट केला असल्याचे सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांनी पत्रकार परिषदेत सांगून सुमन साळवे त्यांचा पती व मुलगा यांनी केलेल्या खोट्या आरोपा विरूध्द न्यायालयात त्यांच्या विरूध्द मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे पायस यांनी सांगीतले.
तर याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना निवेदन दिले आमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल झाला असून, आम्ही देखील याप्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे सांगीतले.
सुमन साळवे व त्यांचा मुलगा अनाधिकाराने शाळेत आले होते व त्यांनी परवाणगी न घेता व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला यात महीला यांचाही व्हिडिओ ते काढत होते त्याला मी विरोध केला त्यांनी शाळेत गोंधळ घातला. शिक्षकांवर धावून आले. आम्ही त्याचवेळी पोलिसांना ११२ ला कॉल करून बोलावले होते व त्यासंदर्भात तक्रारही पोलिसात दिली होती. शाळेतील एका शिक्षकाचा वाढदिवस साजरा करीत असताना संगीत लावले होते. डीजे लावला नव्हता यावेळेस शाळेत काम करणाऱ्या शिक्षिका ही तिथे उपस्थित होत्या. त्यांच्यावर दारू पिण्याचे आरोप केल्याने त्या दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारचे खोटे आरोप आमच्यावर केले आहेत जर दारू पिले असते तर शाळेत आम्ही बोलावलेल्या नंतर पोलीस आले होते त्यांनी आम्हाला त्याचवेळी आम्हाला सांगितले असते तसेच त्यानंतर पोलीस स्टेशनला ह आम्ही फिर्याद दिली आहे.
याबाबत आमच्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल झाला असून, आम्ही देखील याप्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे पायस यांनी सांगीतले.