शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अवैध्य व्यवसायांचे बस्तान बसलेले असताना सदर अवैध्य व्यवसाय बंद करण्यासाठी क्रांती मजदूर सेनेने चक्क अवैध्य व्यवसायांच्या नावांची यादी वरिष्ठ कार्यालयाला देत सदर व्यवसाय बंद करण्याच्या मागणी साठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अवैध्य व्यवसायांचे बस्तान बसल्याचा आरोप क्रांती मजदूर सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी करत मटका, गांजा, दारु या अवैध्य व्यवसायांची यादी निवेदनाच्या माध्यमातून देऊन सदर अवैध्य धंद्यांना आशिर्वाद कोणाचा असा सवाल करत सर्व अवैध्य व्यवसाय तातडीने बंद करुन व्यवसाय चालकांवर कारवाई करावी अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालयच्या गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा क्रांती मजदूर सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला असल्याने आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर याबाबत शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता जेथे अवैध्य व्यवसाय आढळून येतील तेथे कारवाई सुरुच आहे मात्र तरी कोठे अवैध्य व्यवसाय आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.