शिरूर
( प्रतिनिधी ) समाजामध्ये घडणाऱ्या सध्याच्या घटना पाहता युवतींच्या रक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी प्रत्येक आई व महिला शिक्षकांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मत शिक्रापूर महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी व्यक्त केले.
केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनि. कॉलेज केदूर येथे बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमिवर आयोजित शिक्षक पालक सभेत पालकांना मार्गदर्शन करताना शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे बोलत होत्या, यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्राचार्य अनिल साकोरे, कल्याणी ढोकले, रामशेठ साकोरे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सतिश थिटे, शहाजी सुक्रे, श्रीहरी पऱ्हाड, भाऊसाहेब थिटे, भाऊसाहेब साकोरे, पोलिस पाटील सतिश गावडे, संदीप सुक्रे, मयुरी खर्डे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी बोलताना विद्यार्थिनींनी सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, मैत्री करतांना काळजी घ्यावी, इ़स्टाग्राम व फेसबुक यावर कौटु़ंबिक व वैयक्तिक फोटो टाकणे टाळावे, भावनिकतेच्या आहारी जाऊ नये, मोबाईलचा अति वापर करू नये, सज्ञान नसलेल्या व्यक्तीने वाहन वापरू नये, आपल्याबाबत वेगळे काही घडत असेल तर पालक अथवा शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावे असे सांगत विशेष म्हणजे विद्यार्थिनींबाबत आई व महिला शिक्षकांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे देखील महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत थिटे यांनी केले तर रामशेठ साकोरे यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ – केंदूर ता. शिरुर येथील विद्यालयात युवती व पालकांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे.