मांडवगण फराटा शाळेसाठी जगताप भावंडांनी केली सात गुंठे जमीन दान

9 Star News
0
शाळेसाठी तीन भावंडांनी केली सात गुंठे जमीन दान 
शिरुर/प्रतिनिधी - गोर - गरीबांच्या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील जगतापवाडीतील तीन भावंडांनी शाळेला सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केली आहे.
           जगतापवाडी हा परिसर मांडवगण फराटा गावापासून तीन ते चार किलोमीटर दुर आहे. येथील मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी गावात यावे लागत होते. शेत मजुरांच्या मुलांसह गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनाही प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी येथील शेतकरी राजेंद्र पोपटराव जगताप, संजय पोपटराव जगताप व कांतीलाल पोपटराव जगताप या तीन भावंडांनी आजोबा स्व. बयाजी शंकरराव जगताप व वडील स्व. पोपटराव बयाजी जगताप यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी सात गुंठे जमीन दान केली आहे. हा परिसर बारमाही बागायती आहे. ऊस, कांदा, कापुस, डाळींब, केळी, खरबुज, कलिंगड येथे चांगल्या प्रकारे पिकत आहे. साहजिकच येथील जमिनींना साधारणतः तीस ते चाळीस लाख रुपयांचा एकरी बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे लाखो रुपयांची जमीन दान केल्याने या भावंडांचे कौतुक होत आहे. या कुटुंबाचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
             यावेळी सरपंच समिक्षा कुरुमकर, उपसरपंच पांडुरंग मोरे.अशोक जगताप. प्रतिक्षा जगताप,प्रविण जगताप. सोमनाथ जगताप. प्रविण शितोळे,मुख्याध्यापक थोरात , थोरात मॅडम व जगताप परिवार उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!