शिक्रापूरात गारुड्याकडील नाग सर्पमित्रांकडून जप्तनिसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी

9 Star News
0
शिक्रापूरात गारुड्याकडील नाग सर्पमित्रांकडून जप्त
निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी
शिरूर 
( प्रतिनिधी ) नागपंचमी सण नुकताच साजरा झाला असून गारुडी मुक्त नागपंचमी साजरी करण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केलेले असताना शिक्रापूरच्या आठवडे बाजारात नाग घेऊन फिरणाऱ्या गारुडी दाम्पत्याकडील नाग जप्त करुन योग्य उपचार करत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.
                           शिक्रापूर ता. शिरुर येथील आठवडे बाजारात एक गारुडी दांपत्य नाग घेऊन फिरत असल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली, त्यांनतर शिरुर वनविभाग रेस्क्यू टीम मेंबर व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, शुभम वाघ, अमोल कुसाळकर, राजेश मुंडकर यांसह आदींनी बाजारात धाव घेत शिक्रापूर समस्या उपाय ग्रुपचे गणेश सासवडे यांसह आदींच्या उपस्थितीत सदर नाग जप्त केला, दरम्यान नागाचे तोंड चिटकवल्याचे दिसून आले, दरम्यान सर्पमित्रांनी याबाबतची माहिती शिरुर वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे व नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना देत नागाचे तोंड मुक्त करुन तळेगाव ढमढेरे येथून आलेल्या गारुड्याला समाज देऊन नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे. यावेळी बाजारातील अनेक नागरिक व ग्रामस्थांनी सर्पमित्रांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे गारुड्यांकडील नाग जप्त करताना सर्पमित्र.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!