शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूर शहरात नगरपरिषदेच्या वतीने फ्लेक्स बंदी केली असताना मात्र राजकीय नेत्यांचे फ्लेक्स खुलेआम लावले जातात याकडे शिरूर नगरपरिषद लक्ष देणार आहे का नाही. हा फार्स केवळ सर्व सामान्य नागरिकांसाठी आहे का? या शिरूर शहरातील फ्लेक्स बंदीला राजकारण्यांनी फासला हरताळ.
शिरूर शहरात गेले अनेक वर्षापासून नगरपरिषदेच्या वतीने फ्लेक्स बंदी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी एखाद्या फ्लेक्स शहरात लावला तर नगरपरिषद कर्मचारी लावलेला फ्लेक्स काढून टाकतात. नियमाने हे बरोबरही आहे. ज्यावेळी शहरात फ्लेक्स बंदी केली जाते त्यावेळेस सर्वांना न्याय सारखाच असायला हवा.
परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात खाजगी क्लासेस वाले, कॅफेवाले, हॉटेलवाले , राजकारणी हे शहरात खुलेआम विद्युत खांबावर किंवा रस्त्यावर छोटे-मोठे फ्लेक्स लावत असतात. शहरात एका राजकीय नेत्याचे वाढदिवसाचे फ्लेक्स मोठ्या प्रमाणात शहरात लागले आहे परंतु याकडे लक्ष देण्यात शिरूर नगर परिषदेत वेळ नाही का ?
शिरूर शहरात विद्याधाम शाळेसमोर एका तालुक्यातील मोठ्या दिमाखात लावला तर एसटी स्टँड समोर एका कार्यक्रमाचा फ्लेक्स लावला आहे हा फ्लेक्स रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रमूख रस्त्यावर नगरपरिषद मुख्याधिकारी पासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत येण्या जाण्याच्या रस्त्यावर फ्लेक्स लावला आहे.
परंतु सत्तेत असणाऱ्या या पक्षाच्या नेत्याचा फ्लेक्स काढायची हिम्मत नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये नाही का? केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच फ्लेक्स बंदी नगरपरिषदेने केली आहे का?
एखादा धार्मिक कार्यक्रम एखाद्याचा मृत्यू किंवा दशक्रिया विधी याबाबतचे फ्लेक्स लावले तर हरकत नाही. परंतु वाढदिवसाचे फ्लेक्स लावणे हे योग्य आहे का?
जर हे योग्य असेल तर यापुढे शिरूर शहरात नगरपरिषदेने फ्लेक्स बंदी उठवावी. व सर्वसामान्य नागरिकांनाही त्यांच्या आनंदाचे क्षण फ्लेक्स मधून नागरिकांपर्यंत पोहोचू द्यावे.
जर फ्लेक्स वर कारवाई झाली नाही तर या पुढील काळात शिरूर शहरात सर्वसामान्य नागरिक खुलेआम फ्लेक्स लावण्यात हरकत नाही असेच म्हणावे लागेल. तर नगर परिषदेने केलेले फ्लेक्स बंदीला या राजकिय लोकांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्समुळे हरताळ फासला असे म्हणावे लागेल.
काही राजकीय नेते कार्यकर्ते शहरातील एखाद्या चांगल्या माणसाचा प्रतिष्ठित माणसाचा फ्लेक्स लावलेला असेल तर त्याबाबत सोशल मीडियावर त्याची बदनामी केली जाते. मंग राजकारणाचे फ्लेक्स लावल्यावर तुम्ही मूग गळून गप्प का? असा सवालही उपस्थित होतो.
