अखेर रामलिंग (शिरूर)घोटीमळा येथे बिबट्या पिंजऱ्यात झाला जेरबंद..

9 Star News
0

शिरूर दिनांक प्रतिनिधी 
शिरूर पंचक्रोशी फिरणारा बिबट्या अखेर रामलिंग शिरूर घोटीमळा येथे माजी सरपंच नामदेवराव जाधव यांच्या घराजवळ पिंजऱ्यात झाला जेरबंद त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या भागात बिबट्यांचा वावर या अगोदरही झाला परंतु बिबट्या जेरबंद होणे ही या भागातील पहिली घटना आहे.
    गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर पंचक्रोशी परिसरात बोराडे मळा महाजन मळा रामलिंग घोटी मळा दसगुडे मळा, पाषाण मळा या लोकवस्तीच्या व शाळा परिसरात या बिबट्याचा वावर होता. अनेकांनी हा बिबट्या पाहिला होता काहींना रात्रीचे दिवसा शेतात रस्त्यावर दर्शन झाले  त्याचे फोटो त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले होते. 
       या भागात बिबट्याच्या वावराने मात्र आजपर्यंत कुठल्याही पशुधनावर किंवा मनुष्यावर हल्ला केला नाही. परंतु या भागातील श्वानांची संख्या कमी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
         परंतु शिरूर वन विभागाने म्हणावे असे या भागाकडे व बिबट्याच्या वावर असण्याकडे लक्ष दिले नव्हते. दरवेळी प्रमाणे बिबट एका जागेवर राहत नाही हे त्यांचे कायमचे उत्तर तयारच असते त्याप्रमाणे त्यांनी उत्तर दिले होते. 
          परंतु गेल्या दोन ते तीन दिवसापासून रामलिंग घोटीमळा येथे माजी सरपंच नामदेवराव जाधव यांच्या घरापुढे गेल्या तीन ते चार दिवसांपसून
 रोज बिबट्या येत होता. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली होती. अखेर स्वतः जाधव कुटुंबियांनी वन विभागाच्या साह्याने दोन दिवसापूर्वी या भागात पिंजरा लावला होता. आज रात्री आठ वाजता या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी या भागात झाली होती. 
      गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर गोटीमळा परिसरात होता. आमच्या घराजवळ त्याचे दर्शन झाले त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या पकडला गेल्याने नागरिक यांनी समाधान व्यक्त केले. 
         नामदेवराव जाधव माजी सरपंच शिरूर ग्रामीण 
         गेल्या काही दिवसांपासून बोराडे माळा ते रामलिंग या परिसरात बिबट्याचा वावर होता. यामुळे शेतकरी वर्ग शेतात जाण्यात धाडस करत नव्हता त्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा व दाट लोकवस्ती असल्याने शालेय विद्यार्थी नागरिकांच्या जिवाला कुठला धोका होऊ नये याकरिता ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती केली होती. हा बिबट्या जेरबंद झाल्याने धोका टळला आहे.
       बाबाजी वरपे, उपसरपंच शिरूर ग्रामीण.
       अखेर वन विभागाची वनपाल एस एस भुतेकर यांना बोलावून जेरबंद झालेल्या बिबट्या ताब्यात घेतला.
        हा मादी बिबट्या असून दोन ते अडीच वर्षाचा असल्याचे त्यांनी सांगितले त्याची माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात रवानगी केली आहे.
एस एस भुतेकर,वनपाल शिरूर वनविभाग.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!