कोरेगाव भिमातील कंपनीतून साडेपाच लाखांचा ऐवज चोरी

9 Star News
0
कोरेगाव भिमातील कंपनीतून साडेपाच लाखांचा ऐवज चोरी
शिरूर 
( प्रतिनिधी ) कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील एका कंपनीतून फ्रीजसाठी बनविण्यात येणारे तांब्याच्या धातूंचे तब्बल पाच लाख पन्नास हजारांचे पाईप चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे जैपान मेन्यू कंपनी असून सदर कंपनीमध्ये तांब्याच्या धातू पासून फ्रीज साठी लागणारे पपार्ट बनवले जातात, सदर कंपनीचे कामगार सकाळच्या सुमारास कामावर आले असता त्यांना खिडकीच्या जाळ्या व गज तुटलेले दिल्याने त्यांनी व्यवस्थापकांना माहिती दिली असताना कंपनीच्या व्यवस्थापकांनी कंपनीमध्ये पाहणी केली असता कंपनीतील तब्बल पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तांब्याच्या धातूचे पार्ट चोरीला गेल्याचे निदर्शंनास आले, याबाबत कमलेश रमेशभाई पांचाल वय ५६ वर्षे रा. वाघोली ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!