शिरूर तालुक्याचे नेते जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा

9 Star News
0
शिरूर दिनांक २० प्रतिनीधी 
         शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा बडा नेता आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या घरावर आज पहाटे ईडीने धाड टाकली असून, यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली असली तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार करणारे बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा पडणे हे बुचकळ्यात पडण्यासारखे आहे. 
         गेल्या चार वर्षातली ईडीची ही दुसरी कारवाई असून बांदल बँक फसवणूक प्रकरणातही बरेच महिने जेलमध्ये होते नुकतेच काही महिन्यांपूर्वी ते जामिनावर सुटले आहेत.
         नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मंगलदास बांदल यांनी अजित पवार पक्षाचा प्रचार केला होता तर बारामती मध्ये प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेतही त्यांनी टीका केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते.
       पुण्यातील हडपसर आणि शिक्रापूर येथील दोन्ही घरांवर ही धाड पडली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य घरातच असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत. बांदल यांचे भाऊ आणि पत्नी शिक्रापूर येथील निवासस्थानी आहेत तर हडपसर येथील निवासस्थानी स्वतः मंगलदास बांदल आणि सोबत पुतणे असल्याचे समजते.
         मागील ईडीच्या धाडीच्या वेळेस त्यांनी तत्कालीन आमदार भाजपा व सध्याचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर संशय घेतला होता. ही धाड निवडणूक जवळ आल्यावरच पडली होती.
           शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ते इच्छुक होते आणि निवडणूक जवळ येतातच  पाय पसरणार असे दिसत असताना अचानक त्यांच्या घरावर ईडीची धाड म्हणजे राजकारणाचे बळी तर पडत नाही ना अशी शंका येऊ लागली असली तरी लोकसभा निवडणूक त्यांनी महायुतीचे उमेदवाराचा प्रचार केला होता असे असताना त्यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचा छापा कसा व का पडला यांच्यामागे कोण हा संशोधनाचा विषय आहे. राजकीय वर्तुळात चर्चेंना उदान आले असून उलट सुलट चर्चा सुरू असून ऐन निवडणुकीत बांदलांची धांदल उडवण्यामागे नक्की कोण?

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!