मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आमदारा आदित्य ठाकरे हे पहाणीसाठी मालवण येथे गेले असताना खासदार नारायण राणे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असून याचा शिरूर तालुका व शिरूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने निषेध करून नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नारायण राणेच करायचं काय खाली डोकं वर पाय... नारायण राणे आहे कोण कोंबडी चोर कोंबडी चोर... अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख कैलास भोसले,तालुकाप्रमुख पोपट शेलार, तालुका महीला संघटक सुमन वाळुंज, शहरप्रमुख संजय देशमुख, जिल्हा महीला आघाडीच्या शैलजा दुर्गे, खुशाल गाडे,तालुका संघटक राजेंद्र शिंदे, सुनिल चौधरी, नितिन मुळे,उपशहरप्रमुख महादेव कडाळे, माणिक गव्हाणे,गणेश शिवले, ओमकार जवक, अजय पोटे, आकाश पोटे, उपस्थित होते.
मालवण येथे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी गेलेले युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र संस्कृतीला काळीम फासणारी वक्तव्य करीत घरातून खेचून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याचा निषेध शिरूर तालुका शिवसेना व शिरूर शहर शिवसेना यांच्यावतीने करण्यात आला असून नारायण राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनात केली आहे.