मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वतीने आज शिरूर बाजार समिती आवारात मुक आंदोलन करीत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज पुष्पहार घालून हे निषेध आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून हाताला काळ्या पट्ट्या लावल्या होत्या.
यावेळी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार )प्रदेश सचिव तृप्ती सरोदे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दादापाटील पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य दादापाटील घावटे, राजेंद्र कोरेकर, माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, कुंडलिक शितोळे महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे, जयवंत साळुंखे, अमोल वरपे, रंजन झांबरे , अमित गव्हाणे, युवती शहराध्यक्ष पुनम मुत्याल, शकीला शेख, शमशाद खान, संजना वाव्हळ, मनीषा ढवळे, सागर खंडागळे, अमोल कांगुने, अंकुश शितोळे ,दादासाहेब ढवळे, अजित जाधव , भाऊसाहेब चौगुले, सुशील सुर्वे उपस्थित होते.
मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला ही अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप आणणारी घटना आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे.
मालवण मधील राजकोट किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करीत भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुध्द अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी. सरकारने अहोरात्र काम करुन राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तीशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी शिरुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदनात केली आहे