जनहित सोशल फाउंडेशन च्या वतीने जनहित कट्टा या नावाने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करणार

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
जनहित सोशल फाउंडेशन च्या वतीने जनहित कट्टा या नावाने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती जनहित सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण काळभोर यांनी दिली आहे.
     या कार्यक्रमाचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सात वाजताजनहित सोशल फाऊंडेशन कार्यालय,संभाजीनगर ,कदमवाकवस्ती ,लोणी काळभोर येथे होणार आहे.
दिनांक 11 ऑगस्ट रोजी नुकतीच जनहित सोशल फाउंडेशन ची बैठक संपन्न झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
     जनहित कट्टा या सदराखाली वैचारिक सामाजिक शैक्षणिक ऐतिहासिक साहित्यिक कला क्रीडा उद्योग व्यापार या विषयावर मुक्त संवाद होणार आहे.
     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनहित सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष प्रवीण काळभोर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!