श्री रामलिंग महाराज की जय.... हर हर महादेव च्या जयघोष पवित्र श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी श्रीरामलिंग भक्तांनी भर पावसात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गुलाबाच्या फुलांनी सजलेला ओम ... आणि दोन्ही बाजूला असलेले आकर्षक फुलांची त्रिशूल आणि पडणाऱ्या पाऊस धारा यामुळे अवघे मंदिर भक्ती भावात नाहून निघाले तर रक्षाबंधन सण असल्याने अनेक महिलांनी आपल्या भावाला राखी वाहिल्याचे दिसून आले त्यानंतर प्रत्येक बहिणीला श्री रामलिंगानी पाऊस रुपी आशीर्वादाची भेट दिली.
माजी नगरसेवक निलेश लटांबळे यांच्या वतीने
आकर्षक फुलांची सजावट केली होती.
पवित्र श्रावणी सोमवारचा हा तिसरा सोमवार पहाटेपासूनच प्रभू श्री रामलिंगाच्या दर्शनासाठी महिला पुरुष वृध्द व लहानगे यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्री पडलेला पाऊस आणि दिवसभर पावसाची होणारी रिप रीप याची परवा न करता भक्त श्री रामलिंग दर्शनात नाहून निघाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी वारी करणारे अनेक भावीक भक्त पहाटे तीन वाजल्यापासूनच शिरूर शहर ते श्री रामलिंग पायीवारी करत महिनाभर दर्शनाला येत असतात आजही त्यांची संख्या मोठ्या प्रमाणे वाढत असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर ग्रामीण रामलिंग ग्रामपंचायत व श्री रामलिंग देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने शिरूर ते श्रीरामलिंग या देवस्थान वाटेवर भक्तांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून प्रकाशासाठी विद्युत दिवे लावल्याने भक्तांनी समाधान व्यक्त केले.
हे दिवे श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांच्यावतीने लावण्यात आले आहे.
रामलिंग देवस्थान परिसरात दर्शनासाठी कुठली अडचण येऊ नये म्हणून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्यावतीने महिला पुरुष पोलीस , होमगार्ड यांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.
