युवकांनी युवतींना राख्या बांधून दिले रक्षणाचे वचन
शिरूर
( प्रतिनिधी ) रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाला राखी बांधून भावाकडून बहिणीच्या रक्षणाचे वचन घेत असते मात्र माहेर संस्थेतील सर्व युवक व पुरुषांनी युवती व महिलांना राखी बांधून त्यांना महिलांचा आदर व रक्षणाचे वचन दिले आहे.
वढू बुद्रुक ता. शिरूर येथील अनाथ बालक, युवती व महिलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेत माहेर संस्थेच्या संस्थापिका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त समाजसेविका लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन साजरे करण्यात आले, यावेळी माहेर संस्थेतील भावांनी बहिणींना बांधली राखी बांधत ताई प्रत्येक मुलीमध्ये मी बहीण व आई प्रमाणेच पाहिलं प्रत्येक स्त्री चा आदर करेल असे वचन दिले, तर यावेळी बोलताना युवक व पुरुषांनी आजच्या दिवसाप्रमाणे नेहमी प्रत्येक मुली आणि महिलांना सुरक्षित ठेवावे, त्यांच्याकडे लैंगिक वस्तू म्हणून पाहू नये आणि कायम त्यांचा आदर करावा म्हणजे समाजातील विकृती नाहीशी होईल असे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त समाजसेविका लुसी कुरियन यांनी व्यक्त केले, तर या अनोख्या रक्षाबंधनाने युवती देखील भारावून गेल्याचे दिसून आले, दरम्यान बहिणींनी भावांना ओवाळनी देऊ करत आमच्या प्रमाणेच प्रत्येक बहिणीचा आदर करण्याची विनंती केली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेर संस्थेचे व्यवस्थापक रमेश दुतोंडे यांनी केले तर माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी सर्वांचे आभार मानले.
