भाजपाकडून शिरूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दंड थोपटले
शिरूर दिनांक प्रतिनिधी शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना कडवी लढत देण्यासाठी भाजपा कडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या नावाची चर्चा शिरूर विधानसभा मतदार संघांमध्ये असून त्यामुळे हवेली तालुक्यातून प्रथमच एक तगडा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभा राहणार ही लढत कडवी होईल हे मात्र नक्की झाले असले तरी प्रदीप कंद यांनी दंड थोपटले आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र आणि शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. विधानसभेसाठी असणारे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. अनेकांनी आपापल्या परीने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मतदारांच्या भेटीगाठीवर त्यांनी भर दिला असून मोठ्या प्रमाणात त्यांचे कुटुंब ही मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
त्यात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिरूर विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रदीप कंद यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच अचानक त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कट केली. यावर नाराज होऊन प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याबरोबर सलगी करून भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला.
त्यांच्यामुळे भाजपाची ताकद शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढली होती परंतु राजकीय व आर्थिक गणित चुकल्यामुळे भाजपा माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांना पराभवाला सामोर जावे लागेल. त्यात या विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम व त्या भागात आपलेही कार्यकर्ते आपली फळी कंद यांनी तयार केली आहे. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यानंतर भाजपचा चेहरा म्हणून शिरूर विधानसभा मतदार संघासाठी कंद म्हणून समोर आले आहेत. त्यात भाजपा वरिष्ठ नेत्यांची त्यांची जवळीक चांगल्या प्रमाणात झाली आहे.
शिरूर हवेलीत काम करत असताना त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाळामध्ये शिरूर विधानसभेला झुकते माप दिले होते. अनेक विकास कामे या भागात त्यांनी आणली होती. त्यामुळे हवेली बरोबर शिरूर तालुक्यातही त्यांचे वजन वाढले आहे.
माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यानंतर भाजपाला या भागात तगडा उमेदवार म्हणून प्रदीप कंद यांच्याकडे पाहिले जात आहे.
. त्याचा फायदा विधानसभेला नक्कीच होणार आहे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना व हवेलीतील यशवंत सहकारी साखर कारखाना हा कळीचा मुद्दा 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये होणार त्याबरोबर हवेलीतील वाघोली लोणीकंद शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा ते शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. विधानसभेला दोन-तीन महिने अवकाश असून या वाहतूक कोंडी व कारखान्याच्या प्रश्नावर वरिष्ठांची चर्चा करून सकारात्मक निर्णय जर केला तर प्रदीप कंद यांना शिरूर तालुक्यातून व हवेली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी नक्कीच डोक्यावर घेतल्या शिवाय राहणार नाही. महायुतीची असणारी सत्ता याचा पुरेपूर फायदा प्रदीप कंद यांनी घेऊन हे दोन्ही कारखाने सुरू जर करण्याचे काम केले तर शिरूर हवेलीतून प्रदीप कंद यांची घोडदौड सुसाट सुटणार यात शंका नाही.
शिरूर तालुक्याबरोबर हवेली तालुक्यातील चांगल्या विकास कामांच्या जोरावर व एक होतकरू नेता म्हणून सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रामध्ये गेली तीन ते चार दशकांपासून प्रदीप कंद यांचे नाव आहे. तरुणांची फळी व सर्वसामान्य नागरिकांची नाळ त्यांनी ओळखली आहे. त्यांच्या या कर्तुत्वाचा शिरूर हवेलीतील महीला ,पुरुष मतदार राजा बळीराजा व तरुण पिढीवर प्रभाव पडत आहे. त्यात हवेली तालुक्यातून प्रथमच एक तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात प्रदिप कंद यांच्या नावाने उभा राहणार आहे.
येणारी 2024 निवडणूक ही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या राजयोगाची असू शकते..... त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून समोरील उमेदवार विद्यमान आमदार अशोक पवार यांना निवडणूक रिंगणात कडवी लढत देण्यासाठी प्रदीप कंद तयार असून तेच कडवी लढत देऊ शकतात यात आता शंका नाही निवडणुकीसाठी प्रदीप कंद यांनीही निवडणूक रिंगणात दंड थोपटले आहे.
