शिरूर प्रतिनीधी
मावळच्या हद्दीत जुने महामार्गावर ताजे गावाजवळ वेरना कार मधून गांजाची वाहतूक करणाऱ्या शिरूर तालुक्यातील चार जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९८ किलो गांजा ३ मोबाईल फोन एक वेरना कार आता एकूण ५६ लाख ९२ हजार रुपयेचा ऐवज जप्त केला आहे.
कामशेत पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कौतुक केले आहे.
अभिषेक अनिल नागवडे (वय २४),प्रदिप नारायण नामदास (वय २५ वर्षे), योगेश रमेश लगड, (वय ३२ वर्षे), वैभव संजीवण्न चेडे, वय २३ वर्षे, (सर्व रा. पी.एम.टी. जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगाव, ता. शिरूर जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे
कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना २२ ऑगस्ट २४ रोजी सकाळी त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुने हायवेरोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ जण त्यांचे ताब्येतील सिल्हवर रंगाचे वेरना कारमधुन गांजांची वाहतुक करणार असलेची माहिती मिळाली होती. त्यांनी वरीष्ठांना मिळाले बातमीचा आशय सांगून उपविभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग यांचे मार्गदर्शना प्रमाणे दोन पथके तयार करून पंचांचे उपस्थितीमध्ये सापळा लावला.
त्यानंतर मिळाले बातमीप्रमाणे एक वेरना कार नंबर एम. एच १४ जी. वाय ०५५० हि जुने हायवे रोडणे ताजे गावाकडे आलेली दिसली यावेळी पोलीस पथकाने या गाडीवर छापा टाकून या कारची तपासणी केली असता गाडीचे डिक्की मध्ये ९८ किलो गांजा एकूण किंमत ४८ लाख ५० हजार रुपये किमतीचा गांजा ८ लाख रुपये किमतीची वेरना कार, ४२ हजार रुपयांचे तीन मोबाईल, असा एकूण ५६ लाख ९२ हजार रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
कार मध्ये असणारे अभिषेक नागवडे, प्रदीप नामदास, योगेश लगड वैभव चेडे यांना ताब्यात घेतले असता ते शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील रहिवासी असल्याची त्यांनी सांगितले
त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क) २० (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक, रमेश चोपडे, सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील, तसेच पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा फौजदार नितेश कदम, पोलिस अंमलदार. रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली.