शिरुर दि. १४ (प्रतिनीधी )
राज्य शासनामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व मुलांना शाळा सुरु होण्यापूर्वी म्हणजेच पंधरा जून पर्यंत प्रत्येकी दोन शालेय गणवेश देण्यात येतात परंतु या वर्षी शाळा सुरु होऊन दोन महिने झाले स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय सण उद्यावर तरी अजून शालेय विध्यार्थी गणवेशापासून वंचित राहीले आहे.
लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना या मृगजळामागे धावताना सरकारला लाडक्या विध्यार्थ्यांचा मात्र विसर पडताना दिसत आहे.
ज्याला आहे मत त्यालाच किंमत ,
बालगोपालांची नुसतीच होतेय फरफट
१५ ऑगस्टचा दिवस उजाडला आहे. परंतु अद्याप ना शाळेतील मुलांचे कुणी माप घेतलंय ना त्यांच्या गणवेशाची कुणाला चिंता आहे अशी खंत शिरूर तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती तालुका अध्यक्ष संगीताताई शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
त्यामुळे लाडकी बहीण तुपाशी, मात्र लाडका विध्यार्थी गणवेशाविना उपाशी.' राहील्याने पालकवर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
