शिक्रापुरात बिबट्याच्या पिंजऱ्यात अडकले चक्क कुत्रे
बिबट्या जेरबंद झाल्याचे समाधान मात्र नंतर सर्वांचा हशा
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील ताजणे वस्ती व चोविसाला मैल परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने पिंजरा लावला त्यांनतर सकाळच्या सुमारास दरवाजा बंद झाल्याने पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे बोलले गेल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले मात्र नंतर सर्वांचा हशा झाला कारण पिंजऱ्यात बिबट्या ऐवजी कुत्रे अडकल्याचे दिसून आले. आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील ताजणे वस्ती व चोविसाला मैल येथे ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असताना बिबट्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला असताना येथे पिंजरा लावण्याची म्गणी ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्याकडे केली असता शिरुर वनविभागाच्या वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील, रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ यांनी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अतुल ताजणे, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष भुजबळ, सोमनाथ ताजणे, विक्रम ताजणे, जयराम धायरकर, शुभम ताजणे यांसह आदींच्या उपस्थितीत बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला, यावेळी परिसरात शेळी उपलब्ध न झाल्याने त्यांनी कोंबड्या ठेवल्या, सकाळच्या सुमारास पिंजऱ्याचा दरवाजा बंद झाल्याचे निदर्शनास आल्याने सर्वांनी बिबट्या जेरबंद झाल्याची बोंब उठवली, त्यांनतर अतिउत्साही कार्यकर्ते बिबट्या पाहण्यासाठी पिंजऱ्याजवळ गेले असता एकच हशा पिकला कारण कोंबड्या खाण्यासाठी बिबट्या नव्हे तर कुत्रा आला होता आणि बिबट्या ऐवजी कुत्रा पिंजऱ्यात अडकेला होता.
सोबत – बिबट्या ऐज्वाजी पिंजऱ्यात अडकलेला कुत्रा.
