शिरूर येथील विशेष मुलींच्या रक्षाबंधनाने उपस्थित भावांचे डोळे पानावले....

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनीधी 
       ना आईची ओळख ...ना बापाची ओळख... ना भाऊ माहिती... ना बहीण... जिथे स्वतःचीच ओळख नाही.. स्वतःला समजत नाही... ना खाणे पिने कळत नाही.... तिथं प्रकाशाचा अंधुक किरण मिळाला समाजातील आई बहिणींनी वडीलधाऱ्यांनी मदतीचा हात दिला शिक्षकाने राहण्याचे ज्ञान दिले... आणि भावांनी नाते निर्माण केले.... आणि आज हसत मुखाने भावांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करताना नात्यातली ओळख कळली... परंतू त्याचा सार कळलं नाही.... फक्त भाऊ भाऊ म्हणून आवाज देता आला.... हे हि देवालाही क्षणभर विचार करावा लागला असेल हे खरे.... उपस्थित विशेष मुलींनी भावांच्या हातावर राखी बांधताच व भाऊ भाऊ आवाज देताच डोळ्यांच्या कडा मात्र वोलावल्या ....
         शिरूर शहरातील भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांचे वतीने येथील विशेष मुलींच्या (मतिमंद मुली) शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करून या विशेष मुलींनाही व भावाचे नाते टिकवण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
          शिरूर नवीन नगरपरिषदेसमोर गेल्या अनेक वर्षापासून जुन्या इंग्रजांच्या काळातील एक इमारतीमध्ये काही वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने मतिमंद मुलींची शाळा सुरू केली होती. या शाळेत येणाऱ्या मुली मतिमंद ज्यांना काही समजतच नाही अशा या ठिकाणी मुलींची भरती करण्यात आली होती तर काही पालकांनी अशा मुलींना या ठिकाणी आणून सोडून देऊन परत त्यांची तोंड पाहिले नाही. 
       या सर्व मुली एक वेळेस अशा परिस्थितीत होत्या की त्यांच्याकडे लक्ष देणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना वेळच नव्हता.
 कर्मोलदया संस्था ही देवाने पाठवलेली एक देवदूत संस्था या मतिमंद मुलींचा सांभाळ करण्यासाठी आली आणि या मुलींची आयुष्यात बदलून गेले. जिथे आयुष्य संपले होते त्या विषयाला पुन्हा या संस्थेने उभारी दिली गेल्या पंधरा वर्षात येथील मुलींना ३० ते ४० टक्के काहींना ५० टक्के तर काय ना ७० टक्के समजण्याचे ज्ञान आणि शिकवण्याचे ज्ञान या संस्थेने दिले. 
        मतिमंद समजल्या जाणाऱ्या या मुलींच्या शाळेचे नावही बदलून विशेष मुली म्हणून नाव देण्यात आले आणि या विशेष मुलींनी आलेल्या देवदूत महिला शिक्षकांनी त्यांच्या ज्ञानात भर घातली. शालेय शिक्षणाबरोबर विविध कला गुणही त्यांच्यामध्ये निर्माण केले... अनेक वस्तू अनेक महिलांच्या माळापासून ते पुष्पगुच्छ बनवून तिथे येणाऱ्यांना आश्चर्य चकित या मुली करून टाकत आहे. 
        आज या मुलींच्या त्यांना नात्याची ओळख करून देण्याची काम सुशांत कुटे यांनी केले. या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाने मात्र समाजातील दुर्लक्षित मुलींना भाऊ मिळाले या भावांनी त्यांची नाती कायम वाढवावी अशी इच्छा त्या मुलींकडे नसणार आहे कारण त्याचे ज्ञानच त्यांना नाही परंतु भाऊ ते निभवतील.... कारण आजचे रक्षाबंधन एक आगळे वेगळे आणि मनात ठाव घेणारे आणि उपस्थित आमच्या डोळ्याच्या कडा पानवणारे होते... ओवाळणी म्हणून जाताना गहिवरल्या मनाने प्रत्येकाने हुंदका दाटून मदत करण्याचे मात्र निश्चित केले.
     यावेळी संस्थेच्या व्यवस्थापक सिस्टर सौम्या ,
माजी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार, माजी नगराध्यक्ष नसीम खान,रेखा बंदल,मनशांती छात्रालयाचे विनय सपकाळ,शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,मुस्लिम जमातचे अध्यक्ष नसिम खान, माजी शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत शिंदे,समता परिषदेचे किरण बनकर,नगरसेवक विनोद भालेराव,मंगेश खांडरे,डाॅ.परवेज बागवान,श्रीराम सेनेचे सुनिल जाधव,माजी नगरसेवक आबिद शेख,पत्रकार प्रविण गायकवाड,राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष एजाज बागवान,भाजप शिरुर शहर सरचिटणीस अविनाश जाधव,मोरया जीमचे योगेश जामदार,बजरंग सेनेचे उमेश शेळके,राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार)गटाचे हाफिज बागवान,सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सतिश धुमाळ, सागर नरवडे,मनसेचे रविंद्र गुळादे,वसीम सय्यद,आरपीआयचे अध्यक्ष निलेश जाधव, कर्डीले,गीता आढाव,वैशाली साखरे,युवा स्पंदन च्या प्रियंका धोत्रे,सचिन जाधव,राजुद्दीन सय्यद,हुसेन शहा,राहिल शेख,योगेश महाजन,मुश्ताक शेख संस्थेच्या व्यवस्थापक सिस्टर सौम्या आदी उपस्थित होते 


,
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!