मांडवगण फराटा ता. शिरूर येथे कोळपे वस्ती रस्त्यावर भरधाव वेगातील टेम्पो ची दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टेम्पो चालक पळून गेला असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला तर शाळकरी मुलीच्या मृत्यू नंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
टेम्पोचा धडकेत श्रावणी देविदास थोरात (वय -१५ रा कोळपे वस्ती मांडवगण फराटा , शिरुर , ता . शिरुर , जि पुणे) ही मृत्युमुखी पडली तर तीचा भाऊ निरंजन देवीदास थोरात (वय १३ हा गंभीर) जखमी झाला आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
देविदास नाना थोरात (ता.शिरूर जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे 9 ऑगस्ट 2024 रोजी सायं. 04.30 वा. चे सुमाराम मांडवगण फराटा ता.शिरूर जि. पुणे येथील कोळपेवस्ती येथे टेम्पो नं एम. एच. 42 बी. एफ. 3132 वरील अज्ञात चालकाने ताब्यातील टेम्पों हा भरधाव वेगात चुकीचे बाजुने चालविल्यामुळे समोरून येणारे दुचाकीलाएम.एच. 12 ई जी 5174 हीस जोरात धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील श्रावणी थोरात जागीच मृत्यू पावली तर तिचा भाऊ देविदास हा गंभीर जखमी झाला असून या अपघातात मोटार सायकल नं एम.एच. 12 ई जी 5174 हीचे नुकसान झाले आहे . अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो घेऊन पळून गेला आहे.
याप्रकरणी अज्ञात चालकाचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहे .
.