शिरूर
( प्रतिनिधी ) कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे पुणे नगर महामार्गावर बस मधून आलेल्या प्रवासी महिलेचे साडे पाच तोळे वजनाचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जिजाबाई अर्जुन खिळे (वय ६५ वर्षे रा. वाघजाई नगर आंबेगाव खुर्द ता. हवेली जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे कामानिमित्त राहणाऱ्या गणेश खिळे याची आई जिजाबाई नुकतेच बस मधून मुलाकडे आलेली असताना जिजाबाई यांनी प्रवासात त्यांचे साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एका डबीमध्ये ठेवून डबी पिशवीत ठेवली होती, कोरेगाव भीमा येथे मुलाकडे आल्यानंतर जिजाबाई यांनी पिशवीतील दागिने ठेवलेली डबी पाहिली असता डबी मिळून आली नसल्याने दागिने चोरीला गेल्याचे समोर आले, याबाबत जिजाबाई अर्जुन खिळे वय ६५ वर्षे रा. वाघजाई नगर आंबेगाव खुर्द ता. हवेली जि. पुणे या महिलेने शिक्रापूर पोलीस येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन मोरे हे करत आहे.