शिरूर दिनांक प्रतिनिधी
रांजणगाव सांडस ता शिरूर येथील अवैध दारू विक्री व दारू घंट्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महिलांनी केलेले उपोषण शिरूर पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.
कविता रणदिवे व रूपाली काळभोर या बुधवारी (ता.३) ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषणाला बसल्या होत्या. त्याला गावातील महिला व ग्रामस्थ, किसान युवा क्रांती संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आदींनी पाठिंबा दर्शवला होता.
उपोषणाची दखल घेऊन पुणे येथील राज्य उत्पादन शुल्कजी विभाग यांचे निरीक्षक, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार व ग्रामपंचायत कार्यालयाने लेखी आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले
रुपाली संभाजी काळभोर , कविता मनोहर रणदिवे या महिलांनी रांजणगाव सांडस ग्रामपंचायत कार्यालय बाहेर आज पासून उपोषण सुरू केले होते त्यांनी ते मागे घेतले आहे.
विदेशी विक्री करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल
त्याचप्रमाणे अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी केलेल्या व भविष्यात करणाऱ्या व्यक्तीवर कलम 13 व एम पी डी ए 1981कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.