रांजणगाव सांडस ता. शिरूर रणपिसे वस्ती येथे २३ वर्षीय विवाहित महिलेचा अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने दोरीने गळा आवळून इलेक्ट्रिक वायरने करंट देऊन निर्घृण खून केला आहे.यामुळे रांजणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शितल स्वप्निल रणपिसे (वय २३ वर्षे रा. राजणगाव सांडस ता. शिरूर जि. पुणे) या महिलेचा खून करण्यात आला आहे.
स्वप्नील श्यामराव रणपिसे (रा.राजणगाव सांडस ता. शिरूर जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 3 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या पूर्वी राजणगाव सांडस रणपिसे वस्ती येथे राहते घरामध्ये असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून शितल रणपिसे यांचा निळ्या रंगाच्या रस्सीने गळा आवळुन व काळ्या रंगाचे वायरने करंट देवुन तीचा खुन केला आहे.
महिलेच्या पतीने फिर्याद दिल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ,पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहे .