शिरूर
( प्रतिनिधी ) मुखई ता. शिरुर येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश संपादित केले असून छत्तीस विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे.
मुखई ता. शिरुर येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता आठवीचे ९२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेले असताना त्यापैकी ६७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून सदर विद्यार्थ्यांपैकी लवटे सार्थक, कालेकर प्रयाग, वायभट खुशी, कहाणे मानसी, लोखंडे श्रीनाथ, पवार प्रणय, पाटील साक्षी, चोरे सार्थक, पौळ प्रणाली, इरोळे सेजल, तावरे वेदांत, बगाटे श्रेयस, बळे समर्थ, गावडे श्रावण, झावरे संस्कृती, ढगे सृष्टी, पोकळे प्रणव, ढाकणे अथर्व, राऊळ मयूर. साबळे स्नेहा, जाधव समीक्षा, जाधव स्नेहा, सुतार श्रेया, मासळकर सिद्धी, कराड संस्कृती, पोवार संजीवनी, चोरे समीक्षा, निकम श्रावणी, कानडे श्रेया, झगडे अथर्व, वाळुंज भाग्यश्री, साबळे साक्षी, चोरे अपेक्षा, मस्के स्नेहा, रानवडे अन्वी, रणपिसे समीक्षा या ३६ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना किशोर गोगावले, अनिता डमरे, मनोज धिवार, पांडुरंग गायकवाड, सागर चव्हाण, स्वप्नाली वैराळ यांनी मार्गदर्शन केले .
तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष अशोक पलांडे, सचिव सुरेश पलांडे, व मुख्यकार्यकारी अधिकारी मंगेश मोरे, प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले आहे.
फोटो खालील ओळ – मुखई ता. शिरुर येथील पलांडे आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.