शिरूर ( प्रतिनिधी ) धामारी ता. शिरुर येथील दत्तनगर येथे एका चाळीस फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला शिताफीने जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात प्राणिमित्रांना यश आले आहे.
धामारी ता. शिरुर येथील विठ्ठल डफळ हे शेतात गेलेले असताना शेतातील विहिरीमध्ये एक मोठा मोर पडला असल्याचे असल्याचे त्यांना दिसले दरम्यान माजी सरपंच संपत कापरे यांच्या माध्यमातून निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शिरुर रेस्क्यू टीमचे शेरखान शेख यांना याबाबत माहिती दिली असता शेरखान शेख, आपदा मित्र वैभव निकाळजे, सर्पमित्र शुभम वाघ, राजेश मुंडकर, आयान शेख यांनी सदर ठिकाणी धाव घेत विठ्ठल डफळ, वैभव गायकवाड, सचिन गायकवाड यांच्या मदतीने विहिरीमध्ये पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला मोठ्या शिताफीने विहिरीतून बाहेर काढत याबाबतची माहिती शिरुर वनविभागाने वनरक्षक नारायण राठोड यांना देत सदर मोराला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले दरम्यान भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले.
फोटो खालील ओळ - धामारी ता. शिरूर येथे विहिरीत पडलेल्या मोराला जीवदान देताना प्राणीमित्र.