शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ठाकरे गट शिरूर तालुका व शहर यांच्यावतीने शिरूर शहरातील गोरगरीब महिला व नागरिकांना व्यावसायिक यांना १०१ छत्र्यांचे वाटप व विशेष मुलींच्या शाळेत मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
शिवसेना शिरूर तालुका प्रमुख पोपट शेलार, शहर प्रमुख संजय देशमुख, सुनिल चौधरी, महिला आघाडी तालुका संघटक चेतनाताई ढमढेरे, खुशाल गाडे,संभाजी कर्डिले,महादेव कडाळे राजेंद्र चोपडा, रमेश मल्लाव, दीपक फलके संभाजी कर्डिले पप्पू गव्हाणे, संतोष पवार, माणिक गव्हाणे, अनिल सात्रस, राहूल शिंदे,सुनिल जठार, राकेश बोरा व मोठ्याप्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
देशात आणि राज्यात कोरोना काळात देशात सर्वोत्तम काम करून कुटुंब प्रमूख बनण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
संजय देशमुख , शहर प्रमुख शिवसेना
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही शिवसैनिक शपथ घेतो, यापुढील निवडणुकीत राज्यात महविकास आघाडीचे सरकार आणण्याचे काम करणार असल्याचे सांगुन शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकवण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.
पोपट शेलार शिवसेना तालुका प्रमूख