"माझा लढा घोडगंगा साठी"
शिरूर दिनांक प्रतिनिधी शिरूर तालुक्यात अनेक राज्यातील सत्तेत असणाऱ्या पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे नेते व कार्यकर्ते घोडगंगा सहकारी कारखाना वाचवण्याची जाहीर वक्तव्य करत आहे. ही त्यांची वक्तव्य म्हणजे पुतना मावशीच्या प्रेम तर नव्हे ना ! अशी चर्चाही शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे.
शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनु रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना आज शेवटची घटका मोजत आहे.
शिरूर हवेली विधानसभेमध्ये या अगोदर हवेलीची कामधेनु यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. अनेक रती महारती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देशाचे नेते राज्याचे नेते यांनी यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या जाहीर बल्गना केल्या. का रे बाबांनो आज पर्यंत यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू झाला नाही असा सवाल त्यांना करावासा वाटतो.
शिरूर तालुक्याची कामधेनु म्हणून ओळख असलेली घोडगंगा सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यामुळे या भागातील हजारो एकर शेतीतील पिकणारा ऊस या कारखान्याला घातला जातो. परंतु गेली एक वर्षापासून या कारखान्याला राजकीय नेत्यांची नजर लागली आणि हा कारखाना वर्षापासून बंद आहे. कारखाना बंद पडला तर त्याचे खत होण्यास वेळ लागत नाही.
शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब गट व एकनाथ शिंदे गट, काँग्रेस पक्ष एवढे मोठे नेते ज्यांनी या घोडगंगाच्या नावाखाली आज पर्यंत राजकारण केलं आपल्या पोळ्या भाजल्या. आज त्यांनी या कारखाना सुरू करण्यासाठी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना म्हणजे शिरूर तालुक्याचे नाक आज हे नाकच कापण्याचा प्रयत्न होत आहे.
गेल्या दीड वर्षांपूर्वी या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. सर्वच पक्षाने यामध्ये आपले उमेदवार उभे केले.
स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक लढवता येते परंतु या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कामधेनु सुरू होण्यासाठी तुम्हाला कुठलेही आंदोलन किंवा कुठलाही निधी राज्यकर्त्यांकडे मागण्याचा प्रयत्न का करता आला नाही हा संशोधनाचा विषय.
घोडगंगा साखर कारखाना सुरू व्हावा म्हणून ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आशेने सर्वच राजकीय पक्षांकडे पाहत आहे. परंतु सत्तेत असलेले लोक गप्प तर कारखान्याचे सत्तेत असलेले लोक ही वर्षभर गप्प राहिले आहे.
आता कुठे महाराष्ट्राचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडे हा कारखाना सुरू व्हावा म्हणून त्यांची भेट घेतली आहे. परंतु फलित काय येईल हे सांगता येत नाही.
लवकरच कारखान्याचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. त्यासाठीची पूर्वतयारी अगोदरच एक दोन महिने म्हणजे आज पासूनच सुरू करायला हवी होती. परंतु अद्याप राज्य शासनाने कुठलाही निधी किंवा बँकेने कुठलेही जास्तीचे कर्ज दिले नाही म्हणून आजही कारखानाच सुरू होण्याची वाट पाहत आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना खरंच सुरू व्हावा अशी राज्यकर्त्यांनी तुमची इच्छा आहे का? केवळ पूतना मावशीचे प्रेम म्हणून तुम्ही खोट उसंन अवसान आणताय का? असेच म्हणावे लागेल....
क्रमशः .....