शिरूर लोकसभा पराभवाच्या चुका पुन्हा होणार का?

9 Star News
0
                    माझे मत ...
शिरूर दिनांक प्रतिनीधी 
शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पंधरा वर्षे खासदार राहिलेले तुम्ही शिवसेना वाढवली तर नाही परंतु स्वतःचे कार्यकर्तेही वाढवण्यात तुम्हाला यश आले नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाताना जीवाचे कार्यकर्तेही त्यामध्ये आले पाहिजे होते ते आलेच नाही तुमचा स्वार्थ आणि दोन्ही डगरीवर हात म्हणूनच तुमचा लोकसभेला पराभव झाला आहे. पहिले दादा बदलले आणि पराभवात गेले असेच म्हणावे लागेल.
       एखादा लोकप्रतिनिधी निवडणुकीला उभे राहायचे किंवा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आपला पक्ष व आपले कार्यकर्ते यांची एक फळी तयार करायची असते.
      या फळीमार्फत आपल्या कार्यक्षेत्रातील सोसायटी निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, नगरपालिका निवडणूक, बाजार समिती निवडणूक लढवायची असती किंवा आपल्या विचारायचे उमेदवार निवडून आणायचे असतात. 
         यामुळे आपल्या पक्षाची ताकद वाढत असते. त्यातून आपले कार्यकर्ते कायम आपल्या सोबत जोडले जातात तर काही नवीन कार्यकर्ते सत्तेच्या लोभामळे आपल्याकडे येत असतात. यातून पक्ष संघटना एक साखळी म्हणून मजबूत राहते. 
            परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी माजी खासदारांनी अशी कुठल्याही प्रकारची पक्ष बांधणी केलेली दिसत नाही. केवळ आपल्या मागे पुढे करणारे पाच-पन्नास कार्यकर्ते जवळ पाळले होते. त्यांच्यामार्फत संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आढावा आणि काही अति हुशार लोकांकडून त्यांच्या गावातला आढावा घेतला जात होता. 
             परंतु सर्वसामान्य मतदारांना अशा लोकांची कायमची चीड असते तर अति हुशार लोक ज्यांना तळागाळातील मतदारांची काय चर्चा आहे हे समजत नाही. या सर्वांचा फटका तुम्हाला बसला आहे. 
         शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या जिवाभावाची अनेक कार्यकर्ते आहेत जे आपल्यावर खूप खूप प्रेम करतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादा तुम्ही त्यांना साथ देतात परंतु 2024 शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीमध्ये पक्ष बदल करताना तुमचे जीवाभावाचे कार्यकर्तेही तुमच्या बरोबर तुमच्या पक्षात आले असते तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच झाला असता. यातील काही कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत होते तर काही कार्यकर्ते सैरभैर झाले होते.
            त्यात पक्ष बदलाबदली आणि ती स्वार्थासाठी अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली आणि तुम्हाला तुम्हाला अलगद अलगद पराभवाच्या दिशेने घेऊन गेली. समोरचा उमेदवार मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदारांच्या नाराजीत होता. मागील पाच वर्षे हा उमेदवार मतदार संघामध्ये फिरला नाही मी पाहिला तुम्ही पाहिला आणि तमाम शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी नागरिकांनी पाहिला. 
         तरीही तुम्हाला पराभव झाला याबाबत संशोधन करायला पाहिजे परत पक्ष बदलणे किंवा कार्यकर्त्यांची इच्छा करत राहिला तर राजकारण तूम्ही कसे करणार तुमची विश्वासार्था कशी राहणार त्यामुळे राजकारणाचे वार आणि पलटवार झेलत तुम्ही पुन्हा एकदा उभे राहणार यात शंका नाही. परंतु राजकारणाचे आपण अभ्यासक आहात तुमचे राजकारण व विकासकारण सर्वांना माहिती आहे. तरी तुमच्या पासून नागरीक मतदार दूर गेले नाही पाहिजे एवढे जरी लक्षात ठेवले तरी आजची गेलेली खुर्ची उद्या नक्कीच परत मिळेल यात शंका नाही.
          
       
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!