एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून, या दिवशी शिरूर तालुक्यातील व शहरातील मद्य वक्रीची दुकाने बंद ठेवावी अशी मागणी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदनही शिरूर तहसीलदार बाळासाहेब मस्के व शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना देण्यात आले आहे.
साहित्य सम्म्राट लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी १ ऑगस्टला असून शिरुर शहरासह तालुक्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवावी. देशभरात आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामध्ये अबाल वृध्द, तरुणीसह महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र काही समाज विघटक मद्यपान (नशा) करुन उत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. याच पाश्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून १ ऑगस्टला शहरासह तालुक्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी मातंग एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष सतीश बागवे. राजू जाधव. कैलास बागवे. काकासाहेब पाटोळे. गणेश खंदारे. व संघटनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.