पुणे व पिंपरी चिंचवड शहरांना सतर्क व दक्ष राहण्याचा इशारा

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
पुणे व पिंपरी चिंचवड धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणे पाऊस झाल्याने धरणे मोठ्या क्षमतेने भरली आहे तसेच हवामान खात्याने 29 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो त्यामुळे या भागातील लोकांनी सतर्क रहावे जनावरे व उपयुक्त साहित्य हलवावे असा इशारा कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांनी दिला आहे.
       पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८०%, पानशेत ९४% आणि टेमघर ७८% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण ८४% क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.

दि. २८/०७/२०२४ च्या रात्री व दि. २९/०७/२०२४ च्या पहाटे अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे पुढील ४८ तासांत मुठा व पवना नदीपात्रात पर्जन्यमानानुसार व येव्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असुन पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.

उपरोक्त विषयानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!