शिरूर
( प्रतिनिधी ) निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील काळेवस्ती येथे कुत्रे व कावळ्यांच्या हल्ल्यातून एका कासवाला जीवदान देण्यात नागरिकांना यश आले असून सदर कासव प्राणीमित्राच्या ताब्यात देण्यात आले आहे.
निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील काळेवस्ती येथे काही कुत्रे व कावळे कशावरतरी हल्ला करत असल्याचे संतोष काळे यांना दिसले, दरम्यान संतोष काळे यांनी पाहणी केली असता त्यांना कासव दिसून आले, याबाबतची माहिती सरपंच बापूसाहेब काळे यांच्या माध्यमातून निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना दिली असताना शेरखान शेख यांनी सदर ठिकाणी धाव घेत त्या कासवाला ताब्यात घेतले, यावेळी सरपंच बापूसाहेब काळे, संतोष काळे, माजी सैनिक अंकुश काळे, नामदेव भोरडे, दशरथ काळे हे उपस्थित होते, दरम्यान शेरखान शेख यांनी याबाबतची माहिती शिरुर वनविभाग वनपरीमंडल अधिकारी गौरी हिंगणे व नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना देत कासवाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.
फोटो खालील ओळ – निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथे कुत्र्यांच्या तावडीतून जीवदान दिलेले कासव.