शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथील केमिकल सोडणाऱ्या एकाला परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी त्याच्या जेरबंद केले असून केमिकल टॅंकर जप्त केला आहे. रांजणगाव पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
किशोर दशरथ मोरे (वय 36 वर्ष धंदा ड्रायव्हर रा. बेकराईनगर हडपसर ता. हवेली जि.पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी गणेगाव खालसा गावचे ग्रामसेवक श्रीकांत सुखदेव वाव्हळ यांचे फिर्याद दिली होती.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 11 जुलै रोजीचे रात्री गणेगाव खालसा गावचे हद्दीतील कामीनी ओढ्यामध्ये कोणीतरी अज्ञाताने विषारी केमीकल सोडल्याने ओढ्यातील पाणी दुषित झाले होते. त्या केमीकलमुळे पाण्यचा रंगा लालसर होवून सदर पाण्यामुळे मानवी व प्राण्याचे जिवीतास धोका निर्माण झालेला होता. केमीकल युक्त पाणी कामीनी ओढ्यातुन पुढे कॉंढापुरी येथील तळ्याला मिळत असल्याने व कोंढापुरी तलावातील पाणी आजुबाजुच्या गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पुरवठा होत असल्याने यापासून मोठा धोका मानवी जीवनाला झाला असता यामुळें पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. तर दुषित पाण्यामुळे ओढ्यातील वनस्पती करपटुन, मासे मरण पावले होते त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये मितीचे वातावरण निर्माण झाले होते
घटनास्थळास शिरूर प्रांताधिकारी देवकाते, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के , रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , गटविकास अधिकारी महेश डोके, यांनी भेट देवुन पहाणी करुन सदरचे पाणी कोंढापुरी तलावामध्ये जाऊ नये यासाठीच्या उपाय-योजना केल्या होत्या.
घटनेचे गांभीर्य ओळखत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक रांजणगाव
यांना सुचना देत गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन प्रभावी कायदेशिर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यानी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी दोन वेगवेगळी तपास पथके तयार केली होती. गोपनिय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्हयात किशोर दशरथ मोरे (वय 36 वर्ष धंदा ड्रायव्हर रा. बेकराईनगर हडपसर ता. हवेली जि.पुणे) हा पुणे रेल्वस्टेशन येथुन परराज्यात पळुन जाण्याचे तयारीमध्ये असतांना त्यास तपास पथकाने ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.त्यानें गुन्ह्याची कबुली दिली असून, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीतून दि.09 जुलै 2024 रोजी 35 टन हायड्रोक्लोरीक अॅसिड भरुन ते सुखा केमीकल कंपनी, बडोदरा, गुजरात येथे खाली करण्यासाठी भरले होते. परंतु ते गणेगाव खालसा येथील कामिनी ओढ्यात सोडल्याची त्यांने सांगितले. केमिकल टँकरही पोलिसांनी जप्त केला आहे.
हे केमिकल टाकण्यासाठी आणखी कोणा सहभाग आहे का याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे.
आरोपीला शिरूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता शिरूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता त्याला 20 जलैपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण ची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख. पुणे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, संदिप जगदाळे यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास रामदास गावचे पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडेके, करीत आहे.